esakal | भाजपकडून रावत यांची अखेर गच्छंती; उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा
sakal

बोलून बातमी शोधा

uttarakhand cm trivendra singh rawat

अखेर रावत यांना राजीनामा द्यावा लागला असून पत्रकार परिषदेत राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी दिली. पक्षाने याबाबतचा निर्णय घेतला असून मला चार वर्षे राज्याची सेवा करण्याची संधी दिली असंही ते म्हणाले.

भाजपकडून रावत यांची अखेर गच्छंती; उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

डेहराडून - उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याबाबत भाजप आमदारांमध्ये नाराजीचा सूर होता. यामुळे अखेर रावत यांना राजीनामा द्यावा लागला असून पत्रकार परिषदेत राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी दिली. पक्षाने याबाबतचा निर्णय घेतला असून मला चार वर्षे राज्याची सेवा करण्याची संधी दिली असंही ते म्हणाले. आता राज्यात मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पहिल्यांदाच आमदार झालेल्या धन सिंह रावत यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. राजीनामा देण्यासाठी राज्यपालांकडे जाण्याताआधी त्रिवेंद्र सिंह रावत यांची धन सिंह रावत यांनी भेट घेतली होती.

राज्याची चार वर्षे सेवा करण्याची सुवर्णसंधी मला पक्षाने दिली. मला अशी संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. आता पक्षाने दुसऱ्याकडे ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सांगितलं.

राज्याच्या राज्यपालांकडे आपण राजीनामा सोपवला असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपच्या विधीमंडळ सदस्यांची बैठक बुधवारी सकाळी दहा वाजता होणार असल्याचंही ते म्हणाले. 

हे वाचा - त्रिवेंद्र सिंह यांच्या राजीनाम्यानंतर कोण? हालचालींना वेग

पुढचा मुख्यमंत्री कोण?
मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर आता नवीन मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, सीएम रावत यांनी पहिल्यांदाच आमदार बनलेल्या धन सिंह रावत यांचे नाव सुचवले असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच राज्यात एक उपमुख्यमंत्री असणार आहे. यासाठी पुष्कर सिंह धामी यांचे नाव आघाडीवर आहे. 

loading image
go to top