

Uttarakhand Promotes Adventure Tourism at the World Travel Market 2026 in London
esakal
उत्तराखंडची ओळख केवळ चारधाम यात्रा आणि धार्मिक पर्यटनापुरती मर्यादित न ठेवता राज्यातील साहसी पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी देण्याची तयारी सुरू आहे. यासाठी उत्तराखंड पर्यटन विभाग लंडन येथे ३ ते ५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान होणाऱ्या ‘वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट २०२६’मध्ये राज्यातील पर्यटनस्थळे आणि साहसी उपक्रमांचे सादरीकरण करणार आहे.
या आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शनात जगभरातील पर्यटन संस्था, टूर ऑपरेटर्स आणि व्यावसायिक सहभागी होतात. अधिकृत माहितीनुसार, या प्रदर्शनात १८० हून अधिक देशांचे प्रतिनिधित्व, ४ हजारांपेक्षा अधिक प्रदर्शक आणि ५ हजार ५०० हून अधिक आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी होणार आहेत. त्यामुळे उत्तराखंडला जागतिक पर्यटन बाजारपेठेत आपली ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.