
देशभरात धर्मांतराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. काही लोक, काही संस्थांच्या नावाखाली लोकांचे जबरदस्ती धर्मांतर केले जात आहे. या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये धर्मांतराचा कायादा अधिक कडक केला जाणार आहे. आज सचिवालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हे स्पष्ट केले.