Uttarakhand News: उत्तराखंडमध्येसुद्धा लाडकी बहिण योजना! २०२७ च्या निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा, पहिला हप्ता डिसेंबरमध्ये

Baini-Bhuli Scheme : उत्तराखंड सरकारने पाच लाखांहून अधिक महिलांसाठी आर्थिक प्रोत्साहन योजनेची घोषणा केली आहे. डिसेंबर २०२६ मध्ये पहिला हप्ता देण्याचे नियोजन असून, लाभार्थ्यांची नेमकी रक्कम अद्याप जाहीर झालेली नाही.
Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami announced the Baini-Bhuli financial assistance scheme for women at a gathering in Pipalkoti.

Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami announced the Baini-Bhuli financial assistance scheme for women at a gathering in Pipalkoti.

esakal

Updated on: 

देहरादून : उत्तराखंडमध्ये २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी महिलांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यातील पाच लाखांहून अधिक महिलांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी ‘बैंणी-भुली योजना’ सुरू करण्यात येणार असून, या योजनेचा पहिला हप्ता डिसेंबर २०२६ मध्ये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी येथे आयोजित मातृशक्ती संमेलनात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

Loading content, please wait...