
डेहराडून : उत्तराखंडमधील भाजप सरकारने सोमवारी समान नागरी संहिता(यूसीसी) लागू केली. ‘यूसीसी’ लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. येथे २०२२मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने, ‘राज्यात सत्ता मिळाल्यास यूसीसी लागू करण्यात येईल,’ असे आश्वासन दिले होते. त्यानुसार उत्तराखंड सरकारने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.