

Chardham Ved Mahavidyalaya:
sakal
उत्तराखंड: केंद्र सरकारच्या ‘चारधाम चार वेद महाविद्यालय’ या योजनेअंतर्गत उत्तराखंडमध्ये वेद महाविद्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील संसारी येथे हे महाविद्यालय उभारण्यात येणार असून, यासाठी श्री बदरीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने (बीकेटीसी) आपली २२ नाली, म्हणजेच सुमारे सव्वा एकर जमीन देण्याचा प्रस्ताव सर्वसंमतीने मंजूर केला आहे.