
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मुख्यमंत्री पदाचा चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला म्हणून विधिवत पूजा केली. हरिद्वारमध्ये असलेल्या पौंडी ब्रह्मकुंडामध्ये गंगा नदीच्या पवित्र पात्रात पूजा केली. यावेळी त्यांनी उत्तराखंडच्या समृद्धी आणि शांततेसाठी प्रार्थना केली. तसेच, हरिद्वारला येणाऱ्या सर्व भाविकांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी मागणेही त्यांनी यावेळी पवित्र गंगेकडे गेले.
नद्या केवळ जलस्त्रोत नाहीत. तर त्या प्राचिन काळापासून सामाजिक,आर्थिक आणि धार्मिक जीवनाच्या आधार बनल्या आहेत, असे धामी यांनी म्हटले. ग्लोबल वॉर्मिंगसारख्या आव्हानांशी दोन हात करायचे असतील तर नद्या स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणं आपलं कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले, हरिद्वार येथे आयोजित नदी मोहोत्सवात ते बोलत होते.