
उत्तरकाशी : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीनंतर धराली गावामध्ये सुरू असलेल्या मदतकार्यात १५०जणांची सुटका करण्यात आली, तर लष्कराचे ११ जवान बेपत्ता आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (एनडीआरएफ) बुधवारी (ता. ६) दिली. दरम्यान, हिमाचल प्रदेशात किन्नौर कैलास यात्रेच्या मार्गावर अडकलेल्या ४१३ यात्रेकरूंचीही सुटका करण्यात आली आहे.