
उत्तराखंडमध्ये धगफुटीसदृश्य पाऊस सुरू आहे. ज्यामुळे नद्यांची पाण्याची पातळी वाढली आहे आणि काही ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी तातडीने बैठक बोलावली आहे.