
जगभरात महाकुंभमेळ्याचीच चर्चा आहे. या पवित्र पावन स्थळी जाऊन पाण्यात स्नान करणे प्रत्येकाचेच लक्ष्य बनले आहे. प्रयागराजच्या पावन भुमीवर आज उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांनी हजेरी लावली.
उत्तराखंडचे भाग्य बदलणारे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे असे पुष्कर सिंह धामी यांनी आज गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी, मातोश्री आणि मुलगाही उपस्थित होता.