
तूम्हाला नायक चित्रपटातील कंप्लेंट बॉक्स आठवतोय का? ज्यामध्ये सामान्य लोक मुख्यंमंत्र्यांना फोन करून तक्रार करत होते. काही लोकांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवले होते. असाच काहीसा प्रयोग उत्तराखंडमध्ये राबवला जात आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धमी यांनी बुधवारी काही लोकांशी फोनवर चर्चा केली. तक्रार देण्यासाठी असलेला टोल फ्री क्रमांक 1905 या नंबरवर आलेले फोन स्वत: मुख्यंमंत्र्यांनी घेतले. यावेळी लोकांना तूमची कामं नीट पार पडत आहेत का, याची चौकशीही मुख्यमंत्र्यांनी केली.