angel chakma
sakal
उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये त्रिपुरातील एंजेल चकमा या विद्यार्थ्याच्या हत्येचे प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या घटनेची राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कडक शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
उत्तराखंडसारख्या शांत प्रदेशात अशा प्रकारच्या हिंसक घटना कोणत्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.