डेहराडून : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीनंतर गुरुवारी तिसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरू होते. आज ७० जणांना वाचविण्यात यश आले तर अद्याप ५० हून अधिक जण बेपत्ता आहेत, अशी माहिती लष्कराने दिली..उत्तराखंडमध्ये धराली गावाजवळ मंगळवारी झालेल्या ढगफुटीनंतर पूरसदृश निर्माण झाली होती. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला. बचाव पथकाला काल दोन मृतदेह सापडले. परंतु हे मृतदेह या चार मृतांपैकी आहेत की नाही. हे स्पष्ट झाले नाही. वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या ६५ लोकांना येथून ४३२ किमी अंतरावर असलेल्या माटली शहरात विमानाने हलवण्यात आले, असे प्रशासनाने सांगितले. या पुरामुळे सर्वाधिक सर्वात जास्त नुकसान झालेल्या धराली गावात ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक साहित्य विमानाने पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.भारतीय लष्कराने इतर अधिकाऱ्यांशी समन्वय साधून धराली आणि जवळच्या हर्षिलमध्ये मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) विभागाचे मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन आणि रस्ते खचल्यामुळे अनेक भागाचा संपर्क तुटलेला आहे. आतापर्यंत ७० नागरिकांना वाचविण्यात आले असून ५० हून अधिक बेपत्ता आहे, असे लष्कराने येथून प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे..महाराष्ट्राचे अद्याप १५ ० पर्यटकमुंबई, ता. ७ : उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भूस्खलन पूरस्थितीमुळे त्या ठिकाणच्या विविध भागात महाराष्ट्रातील १५१ पर्यटक अडकलेले असल्याची माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली. त्यापैकी १२० पर्यटकांशी संपर्क झाला आहे. हे पर्यटक आयटीबीपी कॅम्पमध्ये सुरक्षित आहेत. उर्वरित ३१ पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांनी उत्तराखंडचे मुख्य सचिवांशी फोनद्वारे चर्चा केली आहे..संपर्क होत नसलेले पर्यटकठाणे - ५सोलापूर - ४अहिल्यानगर - १नाशिक - ४मालेगाव - ३कांदिवली - ६मुंबई उपनगर - ६टिटवाळा - २.मजूरही बेपत्ता असण्याची शक्यताराज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) महानिरीक्षक अरुण मोहन जोशी म्हणाले, ‘‘अत्याधुनिक उपकरणे हेलिकॉप्टरद्वारे घटनास्थळी पोहोचविण्यास आज प्राधान्य आहे. ही उपकरणे घेऊन येणारी पथके बुधवारी रस्ते बंद असल्यामुळे अडकले होती. कोसळलेल्या दरडींचे ५० ते ६० फूट उंच ढिगारे तयार झाले असून, या ढिगाऱ्याखाली अनेक बेपत्ता व्यक्ती अडकल्या असण्याची शक्यता आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये स्थानिक आणि पर्यटकांबरोबरच मजुरांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. कारण अचानक पूर आलेल्या भागात बांधकामे सुरू होती..पुढील २४ ते ४८ तासांचा कृती आराखडानिमलष्करी आणि निम वैद्यकीय पथक चिनुकमधून हर्षिलला पाठविणारराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचारी ‘एमआय-१७’ हेलिकॉप्टरने नेलॉन्गला पोहोचणारउत्तरकाशी आणि टेकलाचा रस्ता खुला करणेपर्यटकांच्या बचावासाठी नेलॉन्ग हेलिपॅडचा वापर करणे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.