

Uttarakhand Pension Scheme
sakal
उत्तराखंड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला आणि दिव्यांगांसह विविध घटकांतील पेन्शनधारकांना आर्थिक मदत दिली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी समाजकल्याण विभागाच्या ऑक्टोबर २०२६ महिन्याच्या पेन्शनची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत जमा केली. या माध्यमातून ९ लाख ९९ हजार ४८४ लाभार्थ्यांना एकूण १४८ कोटी १८ लाख ८४ हजार ५०० रुपये वितरित करण्यात आले.
गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या कॅम्प कार्यालयात आयोजित कार्यक्रमात एका क्लिकद्वारे ही रक्कम हस्तांतरित करण्यात आली. वृद्ध, निराधार आणि दिव्यांग नागरिकांना आर्थिक आधार देऊन त्यांना सन्मानाने जगता यावे, हा सामाजिक सुरक्षा योजनांचा उद्देश असल्याचे धामी यांनी यावेळी सांगितले.