Uttarakhand: मसूरीत अक्षय कुमार, नैनितालमध्ये जाह्नवी कपूर; उत्तराखंड बनतेय बॉलिवूडचे शूटिंग डेस्टिनेशन

Uttarakhand Film Tourism, Akshay Kumar, Janhvi Kapoor : उत्तराखंडमधील मसूरी, लँडोअर आणि नैनिताल येथे बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण सुरू असल्याची माहिती आहे. चित्रपट धोरण २०२४ अंतर्गत सात दिवसांत चित्रीकरण परवानगी देण्याचे उद्दिष्ट असून, राज्याला आंतरराष्ट्रीय फिल्म हब बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Akshay Kumar and Janhvi Kapoor’s film shoots highlight Uttarakhand’s growing appeal as a Bollywood filming destination.

Akshay Kumar and Janhvi Kapoor’s film shoots highlight Uttarakhand’s growing appeal as a Bollywood filming destination.

esakal

Updated on: 

निसर्गरम्य पर्वतरांगा, ऐतिहासिक स्थळे आणि वैविध्यपूर्ण भौगोलिक रचनेमुळे उत्तराखंड चित्रपट निर्मात्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. सध्या मसूरी आणि लँडोअर परिसरात अभिनेता अक्षय कुमार, तर नैनितालमध्ये अभिनेत्री जाह्नवी कपूर यांच्या आगामी चित्रपटांचे चित्रीकरण सुरू असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर उत्तराखंडला आंतरराष्ट्रीय दर्जाचे फिल्म हब बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com