
महिलांनी पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे, त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. तर, महिलांना व्यवसायात प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य सरकारही प्रयत्नशील आहे. त्याच धर्तीवर उत्तराखंडमधील धामी सरकारने एकट्या महिलांना स्वयं –रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. महिलांना दोन लाखांच्या कर्जावर 75 टक्के पर्यंत अनुदान दिले जाईल.
मुख्यमंत्री स्वारोजगर योजने अंतर्गत लघु उद्योग सुरू करण्यासाठी कर्जाची मर्यादा देखील वाढविली गेली आहे. राज्यातील पोल्ट्री फार्मच्या बांधकामासाठी डोंगराळ भागात 40 टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. शुक्रवारी सचिवालयात मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.