Uttarakhand Glacier Flood LIVE: 150 लोक वाहून गेल्याची शक्यता; मुख्यमंत्री घटनास्थळी रवाना

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 7 February 2021

उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला आहे

उत्तराखंड- उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला आहे. धक्कादायक म्हणजे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे धौली गंगा नदीला महापूर आला. तसेच धरणाची कडा तुटल्याने याठिकाणी मोठे पाणी जमा झाले आणि अनेक घरे आणि माणसे वाहून गेले असल्याचं सांगितलं जात आहे. निसर्गाच्या या प्रकोपामुळे जोशीमठ तालुक्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 
 

 

लाईव्ह अपडेट-

- मी गृहसचिवांशी बातचित केली आहे. लवकरच मी गृमंत्र्यांशी देखील बोलेन. त्यांनी हरतर्हेच्या मदतीसाठी तत्परता दर्शवली आहे. - उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिवेंद्र सिंह रावत 

- पंतप्रधान मोदी आता आसाममध्ये आहेत. त्यांनी तिथूनच उत्तराखंडमधील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि इतर अधिकाऱ्यांशी बातचित केली आहे. बचाव कार्याबाबत माहिती घेतली आहे. 

- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तराखंडमधील परिस्थितीचा आढावा घेतला. मी मुख्यमंत्री रावत यांच्याशी बोललो आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. आणखी टीम हवाई मार्गाने पाठवण्यात येईल. आम्ही परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे. देवीभूमिसाठी शक्य ती मदत केली जाईल, असं शहा म्हणाले. 

-पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे ऋषिगंगा आणि धौलीगंगा प्रोजेक्ट जवळचे 150 लोक बेपत्ता झाल्याची माहिती आहे. पॉवर प्रोजेक्टच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाला सांगितले की 150 लोकांचा पता लागत नाहीये. 

- SDRF आणि जिल्हा प्रशासनाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. अडकलेल्या लोकांना शोधणे आणि बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मुख्यमंत्री रावत घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. 

- आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार दोन पुल वाहून गेल्याची माहिती आहे. जीवितहानीची दाट शक्यता आहे, पण आणखी ठोस काही कळू शकलेलं नाही. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttarakhand Joshimath Dam many drowned high alert in state