Kishori Balika Yojana: १४ ते १८ वर्षांच्या मुलींना ३०० दिवस पोषण आहार; 'पोषण ट्रॅकर ॲप'द्वारे कशी करायची नावनोंदणी?

State scheme targets adolescent girls: दरमहा २५ दिवस मिळणार फोर्टिफाइड तांदूळ अन् गव्हाचे वाटप; जाणून घ्या पात्रता अन् आवश्यक कागदपत्रे!
Kishori Balika Yojana uttarakhand

Kishori Balika Yojana uttarakhand

esakal

Updated on

किशोरावस्थेतील मुलींचे पोषण, आरोग्य आणि सर्वांगीण विकास लक्षात घेऊन उत्तराखंड सरकारकडून 'किशोरी बालिका योजना' राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र मुलींना वर्षातील ३०० दिवस पूरक पोषण आहार दिला जातो. त्यासोबत आरोग्य, स्वच्छता आणि पोषणाबाबतही मार्गदर्शन केले जाते.

वर्षातील ३०० दिवस मिळणार पूरक पोषण आहार

योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना दरवर्षी ३०० दिवस पूरक पोषण आहार देण्यात येतो. महिन्यातील २५ दिवसांसाठी फोर्टिफाइड तांदूळ आणि गहू यांचा समावेश असलेला आहार उपलब्ध करून दिला जातो.

किशोरावस्थेत शरीराची वाढ वेगाने होत असल्याने या काळात योग्य पोषण मिळणे महत्त्वाचे असते. त्यामुळे आहारासोबतच मुलींना पोषण, आरोग्य, स्वच्छता आणि जीवनचक्राशी संबंधित विविध विषयांवर माहिती आणि मार्गदर्शन देण्यावरही योजनेत भर दिला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com