Agniveer Test : भरतीत अपयशी ठरलेल्या 23 वर्षीय युवकाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agniveer Recruitment

Agniveer Test : भरतीत अपयशी ठरलेल्या 23 वर्षीय युवकाची आत्महत्या

Agniveer Test : केंद्रातर्फे काही दिवसांपूर्वी लष्करात भरती होण्यासाठी अग्नीवीर योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर या विरोधात देशभरात मोठा गदारोळ माजला होता. या सर्वामध्ये अनेकांनी यामध्ये भरती होण्यासाठी अर्जदेखील केले होते. त्यातील एका उमेदवाराने या भरती परीक्षेत अपयश आल्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमित कुमार असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव असून, हा युवक उत्तराखंड येथील पौरी गढवाल जिल्ह्यातील नौगाव कमंडा गावचा रहिवासी होता.

सुमित अग्निवीर भरती मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोटद्वारला गेला होता. पुढीलवर्षी तो या योजनेत भरती होण्यासाठी पात्र ठरणार नव्हता. यंदाची परीक्षेला बसण्याची ही त्याची शेवटची संधी होती. मात्र, त्यातही तो अपयशी झाला. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी अस्वस्थ झालेला सुमित घरी परतला होता. त्यानंतर त्याने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले आणि कोणाशीही काही बोलले नाही.

दुसऱ्या दिवशी त्याच्या कुटुंबीयांना सुमित त्याच्या खोलीच्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सुमितच्या पालकांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला, अशी माहिती सातपुलीचे उपजिल्हा दंडाधिकारी संदीप कुमार यांनी सांगितले.

अग्निपथ योजनेंतर्गत गढवाल रायफल्सने कोटद्वारमध्ये अग्निवीर सैन्य भरतीचे आयोजन केले आहे. 19 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान हा भरती मेळावा आयोजित करण्यात आला असून, गढवाल विभागातील सात जिल्ह्यांतील 63,000 हून अधिक इच्छुकांनी यासाठी नोंदणी केली आहे.

Web Title: Uttarakhand Man Hangs Himself Failing Agniveer Agnipath Test

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..