
देशभरात छावा चित्रपट प्रदर्शित झाला अन् औरंगजेबाच्या ऐतिहासिक अस्तित्वावरून चर्चा सुरू झाल्या. याच पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. उत्तराखंडमध्ये असलेल्या अनेक रस्त्यांची नावे बदलून ती हिंदू भाषिक देण्यात आली आहेत.
ज्या रस्त्याचे नाव मियावाला होते ते आता रामजीवाला रोड बनले. तर, नवाबी रोड आता अटल मार्ग होणार आहे, याबद्दलची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी दिली.