

Paragliding training in Uttarakhand
esakal
उत्तराखंडमध्ये साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पॅराग्लायडिंग केंद्रे उभारण्याची योजना आखली आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा चंपावत जिल्ह्यात सुरू करण्यात येत असून, त्यासाठी प्राथमिक अनुभव असलेल्या १४१ तरुणांची निवड करण्यात आली आहे.