
उत्तराखंडमध्ये धुवादार कोसळणाऱ्या पावसाने थैमान घातले आहे. उत्तरकाशीमधील आपत्तीग्रस्त धरालीमध्ये मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून, केंद्र सरकारबरोबरच राज्याच्या यंत्रणाही पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी आज (बुधवारी) आपत्तीग्रस्त क्षेत्राचा दौरा केला. यावेळी, आपत्तीग्रस्त नागरिकांची भेट घेतली. त्यांनी मदत आणि बचाव कार्यात कोणतीही कमी पडू न देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.