Uttarakhand Statehood Movement : ४२ आंदोलनकर्त्यांचे बलिदान, गोळीबाराच्या जखमा अन् १०० वर्षांचा संघर्ष; असा झाला उत्तराखंड राज्याचा जन्म!

Uttarakhand State Formation History : स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी उत्तराखंडमध्ये जवळपास शंभर वर्षे संघर्ष झाला. ४२ आंदोलनकर्त्यांचे बलिदान आणि गोळीबाराच्या घटनांनंतर ९ नोव्हेंबर २००० रोजी स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली.
Uttarakhand State Formation History

Uttarakhand State Formation History

sakal

Updated on: 

डेहराडून : स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी झालेला दीर्घ संघर्ष, ४२ आंदोलनकर्त्यांचे बलिदान आणि खटीमा, मसुरी तसेच मुझफ्फरनगरमधील रामपूर तिराहा येथे झालेल्या गोळीबाराच्या घटना... अशा अनेक संघर्षमय टप्प्यांनंतर ९ नोव्हेंबर २००० रोजी उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली. तत्कालीन उत्तरांचल या नावाने अस्तित्वात आलेले हे देशाचे २८ वे राज्य होते. या राज्याच्या निर्मितीमागे जवळपास शंभर वर्षांचा सामाजिक आणि राजकीय संघर्ष होता.

उत्तराखंडची निर्मिती ही केवळ प्रशासकीय पुनर्रचना नव्हती. डोंगराळ भागाच्या स्वतंत्र भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन स्वतंत्र प्रशासन असावे, या मागणीतून ही चळवळ उभी राहिली. राज्य स्थापन होऊन २६ वर्षे झाली असली, तरी स्थलांतर, रोजगार, आरोग्य आणि शिक्षण यांसारखे प्रश्न आजही कायम आहेत.

Loading content, please wait...