

scooty women delivery i
esakal
उत्तराखंड :उत्तराखंडमधील डोंगराळ भागात रोजगाराच्या मर्यादित संधी आणि स्थलांतराचे आव्हान कायम आहे. मात्र, ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्सच्या वाढत्या विस्तारामुळे या भागातील महिलांसाठी रोजगाराचे एक नवे क्षेत्र खुले झाले आहे. बागेश्वर जिल्ह्यातील अनेक महिला आता स्कूटी किंवा दुचाकीवरून घरपोच डिलिव्हरीचे काम करत असून, त्यातून त्यांना आर्थिक स्वावलंबनाची नवी संधी मिळत आहे.
ऑनलाईन खरेदी, किराणा, औषधे, कपडे आणि खाद्यपदार्थ घरपोच मागवण्याचे प्रमाण वाढल्याने डोंगराळ भागातही डिलिव्हरी सेवांची गरज निर्माण झाली आहे. याच संधीचा फायदा घेत महिला डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करू लागल्या आहेत.