
यमुनोत्री मंदिराकडे जाणाऱ्या रस्तावर भिंत कोसळली; 10 हजार लोक अडकले
डेहराडून : उत्तराखंडमध्ये महामार्गाची सुरक्षा भिंत कोसळल्याने सुमारे 10,000 लोक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तराखंडमधील यमुनोत्री मंदिराकडे जाणाऱ्या महामार्गावर ही सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुक ठप्प झाली असून महामार्गालगत विविध ठिकाणी 10 हजार लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे.
(Yamunotri Road Wall Collapse)
हेही वाचा: '15 दिवसांत इमारत पाडा नाहीतर...'; राणा दाम्पत्याला पालिकेचा इशारा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या रस्त्यावर सुरक्षा भिंत कोसळली आहे तो रस्ता पूर्ववत करण्यासाठी ३ दिवस लागू शकतात असं सांगितलं जातंय. दरम्यान या रस्त्यावरून वाहतुक करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. मोठ्या प्रमाणावर पर्यटकही अडकल्याची माहिती समोर आली असून स्थानिक लोकांच्या मदतीने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे.
हेही वाचा: मल्हाररावांनी तेव्हाच ज्ञानवापी मशीद पाडली असती पण काशीच्या पुरोहितांनी...
लोकांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मदत करण्यात येत आहे. लहान वाहनांमधून काही प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मोठ्या वाहनांमधील लोकांना तसेच लांबून आलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी अडचणी येत असल्याची माहिती आहे. तसेच रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.
Web Title: Uttarakhand Yamunotri Wall Collapse 10 Thousand People Stuck
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..