
उत्तरकाशी : उत्तरकाशीतील धराली येथे युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू असून पाच दिवसांपूर्वीच्या ढगफुटीनंतर आतापर्यंत एक हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. शनिवारी दुपारपर्यंत अडीचशेहून अधिक नागरिकांना पूरग्रस्त भागातून बाहेर काढले. दरम्यान, आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून ४९ बेपत्ता असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. महाराष्ट्रातील एक जण बेपत्ता आहे. पूरग्रस्त हर्षिल येथे मोबाईल आणि विद्युत पुरवठा सुरू झाला असून बचावकार्यात हजारांपेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झालेले आहेत.