Crime: पित्यानेच केला लेकीवर बलात्कार; नैराश्यातून तीने घेतला गळफास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape crime

पित्यानेच केला लेकीवर बलात्कार; नैराश्यातून तीने घेतला गळफास

लखनऊ : उत्तरप्रदेशमधील बांदा येथे माणुसकीच्या आणि पितापुत्रीच्या नात्याला काळिंबा फासणारी घटना घडली आहे. एका पित्याने स्वत:च्या मुलीलाच आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. पित्यानेच बलात्कार केल्याने मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान त्या पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.

(Uttrapradesh Crime News)

उत्तरप्रदेशमधील बांदा येथे ही घटना घडली असून एका पित्याने आपल्या मुलीवरच बलात्कार केला आहे. रात्री ही घटना घडल्यानंतर पिडीत तरुणीने ही घटना आपल्या बहिणीला सांगितली होती. त्यानंतर बहिणीने तीची समजूत काढली होती. पण नैराश्यात शुक्रवारी पहाटे तीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यानंतर पिडीत तरुणीच्या बहिणीने सदर घटनेची तक्रार पोलिसांत दिली आहे. तक्रारीवरुन पोलिसांनी पित्याला अटक केली असून पिडीतेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा: मुंबई | सांताक्रुझमध्ये LIC इमारतीला भीषण आग, अग्नीशमन दल घटनास्थळी

दरम्यान हा क्रूर पित्याने दारुच्या नशेत हे कृत्य केले असून गुरूवारी ही घटना घडली आणि शुक्रवारी पहाटे पिडीतेने गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर नराधान पित्याला अटक करण्यात आली आहे आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. घटनेचा पंचनामा केला असून शवविच्छेदनाचे रिपोर्ट आल्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे असं अप्पर पोलिस अधिक्षक लक्ष्मीनिवास मिश्रा यांनी सांगितलं.

Web Title: Uttarpradesh Father Raped Daughter She Suicide

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top