Uttar pradesh : नोएडात इलेक्ट्रॉनिक पार्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

electric park

Uttar pradesh : नोएडात इलेक्ट्रॉनिक पार्क

नोएडा : टॉय पार्क, फिल्म सिटी, मेडीकल डिव्हाईस पार्क, लेदर पार्क अशा विविध प्रकल्पांनंतर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने इलेक्ट्रॉनिक पार्क उभारण्याचा संकल्प सोडला आहे. यमुना एक्सप्रेस वे लगत नोएडाजवळ हे पार्क उभारण्यात येईल. तेथे ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची सरकारला अपेक्षा आहे.

यमुना औद्योगिक विकास प्राधिकरणाचे सीईओ अरुणवीर सिंह यांनी ही माहिती दिली. जेवर विमानतळाजवळ प्राधिकरणाच्या सेक्टर १४ किंवा सेक्टर १० मध्ये २५० एकर जागेत हे पार्क उभारण्यात येईल.

मोबाईल फोन, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादने तयार करणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या तेथे आपली उत्पादन केंद्र उभारतील. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला चालना देण्याच्या सरकारच्या धोरणामुळे गुंतवणूकदार प्रभावित झाले आहेत. हे विमानतळ बांधण्याचा योगी सरकारचा निर्णय विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीच्या संदर्भात या प्राधिकरणासाठी वरदान ठरला आहे, असेही सिंह यांनी सांगितले.

Web Title: Uttarpradesh Noida Electric Park

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..