esakal | UttarPradesh: शिवपालना अजूनही युतीची आशा
sakal

बोलून बातमी शोधा

शिवपालसिंह यादव

आग्रा : शिवपालना अजूनही युतीची आशा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आग्रा : वेगळी रथयात्रा काढूनही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीसाठी समाजवादी पक्षासह (सपा) युती करण्यास अजूनही आशावादी असल्याचे प्रगतीशील समाजवादी पक्षाचे (प्रसपा) अध्यक्ष शिवपालसिंह यादव यांनी सांगितले. इतर धर्मनिरपेक्ष पक्षांसह युतीसाठीही त्यांनी तयारी दर्शविली.

शिवपाल यांनी मंगळवारी मथुरेहून रथयात्रेला प्रारंभ केला. ७५ जिल्ह्यांतून जाणाऱ्या रथयात्रेची सांगता श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत करण्याचे त्यांनी ठरविले आहे. ते म्हणाले की, आमचे पहिले प्राधान्य सपाबरोबर युतीला असेल. भाजपचा पराभव करण्यासाठी इतर कोणत्याही धर्मनिरपेक्ष पक्षाच्या साथीत आम्ही एकत्र येऊ शकतो.

हेही वाचा: नांदेड : शेतात पिकले तेवढे वाहून गेले; एका रात्रीत झाले होत्याचे नव्हते

राज्यातील व केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, या पक्षाने कोणतीही आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. चलनवाढ नियंत्रण, भ्रष्टाचार निर्मुलन, परदेशातून काळा पैसा परत आणणे यांसह शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, चीनकडून आपला भूभाग परत मिळविणे अशा आश्वासनांचीही पुर्तता झालेली नाही.

शिवपाल यांनी २०१८ मध्ये सपामधून बाहेर पडत स्वतःचा पक्ष स्थापन केला.

आमची सामाजिक परिवर्तन यात्रा उत्तर प्रदेशच्या जनतेशी संवाद साधेल. महत्त्वाच्या विषयांवर भाजपने आश्वासनांची पुर्तता केली नसल्याचे जनतेच्या लक्षात आणून दिले जाईल. आपल्या सर्वांना हे विषय माहीत आहेत. पुढील वर्षी आमचे सरकार स्थापन होईल तेव्हा आम्ही त्यांच्या आश्वासनांची पुर्तता करू.

- शिवपालसिंह यादव, उत्तर प्रदेशचे नेते

loading image
go to top