ओडिशात लसीकरण आज तूर्त स्थगित 

स्मृती सागरिका कानुनगो - सकाळ न्यूज नेटवर्क 
Sunday, 17 January 2021

दुसऱ्या टप्प्यात येत्या २५ पर्यंत उर्वरित आरोग्य सेवकांसह पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. या सर्वांची माहिती ‘कोविन’ पोर्टलवर सादर करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. 

भुवनेश्‍वर - कोरोनावरील लसीकरणाला ओडिशात शनिवारपासून सुरुवात झाली असली तरी रविवारी (ता.१७) ही मोहीम देशभरात स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव प्रदीप्ता कुमार मोहपात्रा यांनी काल  दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ते म्हणाले, ‘‘ पहिल्या टप्प्यात ज्या आरोग्यसेवकांना लस दिली आहे, त्यांच्यावर काय परिणाम होतात, याचे निरीक्षण उद्या एक दिवस करण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम सोमवार (ता.१८)पासून लसीकरण सुरळीत पार पडेल. भुवनेश्‍वरमधील कॅपिटल रुग्णालयात काल सकाळी ११च्या सुमारास लसीकरणाला सुरुवात झाली. रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी बिरंची नायक (वय ५१) याला सर्वांत प्रथम लस टोचण्यात आली. त्यानंतर रुग्णालयाचे संचालक आणि डॉक्टरांनी डोस घेतला.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात १६१ ठिकाणी लसीकरणाला आज सुरुवात झाली. प्रत्येक ठिकाणी १०० आरोग्यसेवकांना असे एकूण १६ हजार १०० जणांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात येत्या २५ पर्यंत उर्वरित आरोग्य सेवकांसह पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. या सर्वांची माहिती ‘कोविन’ पोर्टलवर सादर करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaccination in Odisha postponed