esakal | १९७० रुपयांचा वडा पाव ? अहो, पण २२ कॅरेट सोन्याचा!
sakal

बोलून बातमी शोधा

vada pav

१९७० रुपयांचा वडा पाव ? अहो, पण २२ कॅरेट सोन्याचा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मुंबईमुळे जगप्रसिद्ध झालेल्या स्वस्त आणि मस्त वडापावची किंमत दुबईत चक्क १९७० रुपयांपर्यंत वाढली आहे. किंमतीचा हा आकडा ऐकून एखाद्याला वाटले की वडापावला काय सोने लावले आहे का, तर त्याची प्रतिक्रिया अतिशयोक्ती नव्हे तर वस्तुस्थिती ठरेल.

ओ’पाओ नावाच्या रेस्टॉरंटच्या कल्पक चालकाने २२ कॅरेट सोन्याचे अंश असलेला जगातील पहिला वडा पाव बनविला आहे. करामा आणि अल क्योझ अशा दोन ठिकाणी त्यांची सेंटर असून तेथे प्रत्यक्ष जाऊन (डाईन-इन) हा वडा पाव खाता येईल. सोन्याशिवाय यात ट्रफल हे खाण्यायोग्य फंगी असलेले लोणी आणि चीज आहे. या वडापावच्या जोडीला रताळ्याचे फ्राइज आणि गोड लिंबूसरबतही सर्व्ह केले जाते. ही डिश सुशोभित करण्यासाठी सोन्याच्या पानांचा वापर करण्यात आला आहे.

या रेस्टॉरंटने आपल्या इन्स्टा हँडलवर जाहिरातीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सुबक नक्षीकाम केलेल्या लाकडी बॉक्समधून वडा पाव सर्व्ह केला जातो. हा बॉक्स उघडताच पांढरी वाफ बाहेर येते. काही वर्षांपूर्वी दुबईतील एका हॉटेलमध्ये २४ कॅरेटचे खरे आणि खाण्यायोग्य सोने असलेला बर्गर बनविला होता.

loading image
go to top