भगवान राम सीतेसोबत दररोज बसून मद्य प्यायचे; प्रसिद्ध लेखकाचं वादग्रस्त विधान I Lord Shri Ram | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lord Shri Ram KS Bhagwan

वादग्रस्त वक्तव्यानंतर के. एस भगवान यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलीये. सध्या कर्नाटकात हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून वक्तव्य मागं घेण्यास भाग पाडत आहेत.

Lord Shri Ram : भगवान राम सीतेसोबत दररोज बसून मद्य प्यायचे; प्रसिद्ध लेखकाचं वादग्रस्त विधान

बंगळुर : कर्नाटकातील प्रसिद्ध लेखक आणि निवृत्त प्राध्यापक के. एस. भगवान यांनी भगवान श्रीरामाविषयी (Lord Shri Ram) एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. भगवान राम हे दुपारच्या वेळी सीतेसोबत बसून त्यानंतर उरलेला पूर्ण दिवस ते मद्य प्यायचे, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय.

लेखकाच्या या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. सध्या लोकांमध्ये रामराज्य निर्माण व्हावं याची चर्चा सुरू आहे. पण, जर तुम्ही वाल्मिकी रामायणामधील उत्तरकांड वाचलं तर लक्षात येईल की भगवान राम हे आदर्श नव्हते. त्यांनी 11 हजार वर्षं राज्य केलं नव्हतं. त्यांनी फक्त 11 वर्ष राज्य केलं होतं, असा दावा के. एस भगवान यांनी केलाय.

हेही वाचा: Pune : छत्रपती संभाजी महाराजांची ओळख 'धर्मवीर'च; अजितदादांच्या वक्तव्याचा शिवेंद्रराजेंनी घेतला समाचार

हे सांगत असतानाच त्यांनी प्रभू रामाबाबतही वादग्रस्त वक्तव्य केलं. भगवान राम हे दुपारच्या वेळी सीतेसोबत बसून त्यानंतर उरलेला पूर्ण दिवस ते मद्य प्यायचे. त्यांनी आपल्या पत्नीला जंगलात पाठवलं. तिचा जराही विचार केला नाही. त्यांनी एका झाडाखाली तपश्चर्या करत बसलेल्या शंबूक या शूद्र व्यक्तीचं मुंडकं धडावेगळं केलं होतं, त्यामुळं ते आदर्श कसे असू शकतात? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, या वादग्रस्त वक्तव्यानंतर के. एस भगवान यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलीये. सध्या कर्नाटकात हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून वक्तव्य मागं घेण्यास भाग पाडत आहेत.