

मुंबई- लोकसभा निवडणुका आठ महिन्यांवर येऊन ठेवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारकडे एक वेगळी मागणी केली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात धार्मिक वातावरण बिघडू शकते. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत धार्मिक स्थळांच्या सुरक्षेची जबाबदारी नॅशनल सेक्युरिटी गार्ड किंवा भारतीय सशस्त्र दलांना द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी देशात अशांतता निर्माण केली जाऊ शकते आणि त्यासाठी मंदिरांचा वापर केला जाऊ शकतो, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी थेठ लढाई पाहायला मिळणार आहे. निवडणुकीच्या पुढे देशात धार्मिक ध्रुविकरण करण्यासाठी मंदिरांना लक्ष्य केले जाऊ शकते, अशी शक्यता प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलीये.
विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी पाच धार्मिक स्थळांची यादी जाहीर केली आहे. या पाच धार्मिक स्थळांना सुरक्षेची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले आहेत.
या धार्मिक स्थळांमध्ये वाराणसीतील ज्ञानवापी मशीद, अयोध्येतील रामजन्मभूमी, मथुरेतील शाही ईदगाह,माता वैष्णो देवी मंदिर, स्वामीनारायण अक्षरधाम या पाच मंदिरांचा समावेश आहे.
1. वाराणसीतील ज्ञानवापी मशीद,
2. अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर,
3. मथुरेतील शाही ईदगाह,
4. माता वैष्णो देवी मंदिर, कटरा
5. स्वामीनारायण अक्षरधाम, दिल्ली
निवडणुका होईपर्यंत हे ५ धार्मिक स्थळे नॅशनल सेक्युरिटी गार्ड किंवा भारतीय सशस्त्र दलांच्या निगराणी खाली राहावेत असे आंबेडकर यांनी सूचित केले आहे.
इंडिया आघाडीने देखील ही भूमिका घेतली पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. दरम्यान, नेमकं कोणाला देशात धार्मिक वातावरण बिघडवायचं आहे, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी कोणत्याही पक्षाचं किंवा व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.