Vande Bharat Sleeper Train Speed Test Video : ताशी १८० किमी वेग तरीही काठोकाठ भरलेल्या ग्लासांमधून एकही थेंब पाणी सांडले नाही...!

Vande Bharat Sleeper Train Test : 'वंदे भारत' स्लीपर ट्रेनची यशस्वी चाचणी; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केला स्पेशल व्हिडिओ
The Vande Bharat Sleeper Train during its successful high-speed trial, demonstrating exceptional stability even at 180 kmph without water spilling from a glass.

The Vande Bharat Sleeper Train during its successful high-speed trial, demonstrating exceptional stability even at 180 kmph without water spilling from a glass.

esakal

Updated on

Vande Bharat Sleeper Train Successful Trial : भारतीय रेल्वे लवकरच नवीन प्रगत तांत्रिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज वंदे भारत स्लीपर ट्रेन  सादर करणार आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने  नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेनची स्पीड टेस्ट घेतली आहे.  रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेनबद्दल महत्त्वाचे अपडेट देणारा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये, ट्रेन ताशी १८० किमी पेक्षा जास्त वेगाने धावताना दिसत आहे. भारतीय रेल्वे विभागाने या व्हिडिओमध्ये ट्रेनचा उच्च वेग, संतुलन आणि स्थिरता दाखवण्यासाठी एक प्रयोगही करून दाखवला आहे. ज्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली. हा प्रयोग नवीन पिढीच्या ट्रेनचे प्रगत तांत्रिक वैशिष्ट्ये दर्शवतो.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर चाचणीचा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये असेही दिसून आले आहे की चाचणी दरम्यान ट्रेनने ताशी १८० किमीचा कमाल वेग गाठला असला तरी, काठोकाठ भरलेल्या काचेच्या ग्लासांमधून पाण्याचा एक थेंबही सांडला नाही.

The Vande Bharat Sleeper Train during its successful high-speed trial, demonstrating exceptional stability even at 180 kmph without water spilling from a glass.
LPG Subsidy : 'एलपीजी सबसिडी' बंद होणार?; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "आज, रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी घेतली. ही ट्रेन कोटा-नागदा विभागादरम्यान ताशी १८० किमी वेगाने धावली. शिवाय, या नवीन पिढीच्या ट्रेनची प्रगत तांत्रिक वैशिष्ट्ये पाण्याच्या चाचण्यांद्वारे यशस्वीरित्या दर्शवण्यात आली."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com