सपा खासदार म्हणतात, 'वंदे मातरम् इस्लामविरोधी'

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जून 2019

- समाजवादी पक्षाचे खासदार म्हणतात, वंदे मातरम् इस्लामविरोधी.

नवी दिल्ली : संसदेत वंदे मातरम् म्हणणे इस्लामविरोधी आहे, ते मला मान्य नाही. त्यामुळे आम्ही ते म्हणणार नाही, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे खासदार शफिकुर्र रहमान बर्क यांनी आज (मंगळवार) केले. बर्क यांनी लोकसभेत सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी हे विधान केले. 

शफिकुर्र रहमान बर्क हे उत्तर प्रदेशातील संभल लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. त्यांनी लोकसभेत वंदे मातरम्च्या घोषणा देण्यावरही विरोध केला. ते म्हणाले, मी वंदे मातरम् म्हणणार नाही. कारण ते इस्लामविरोधी आहे. त्यामुळे ते मला मान्य नाही. मात्र, मी भारतीय घटनेचा आदर करतो.

दरम्यान, वंदे मातरम इस्लामविरोधात आहे ते म्हणण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vande Mataram Is Against Islam says MP Shafiqur Rahman Barq