

narendra modi
esakal
केंद्र सरकार आता राष्ट्रीय गीत वंदे मातरमला जन गण मन प्रमाणेच समान सन्मान आणि नियम देण्याच्या तयारीत आहे. यासाठी एक स्पष्ट प्रक्रिया विकसित करण्याचा विचार चालू आहे. या महिन्याच्या सुरुवातीला गृह मंत्रालयाने एक मोठी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा झाली. भारतीय राज्यघटनेनुसार दोघांनाही राष्ट्रगीत सारखा आदर दिला जातो. पण नियम आणि बंधनकारक पद्धतींमध्ये मोठा फरक आहे.