

Chat Capital
esakal
भारतातील स्ट्रीट फूडची चर्चा 'चाट'शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. तिखट, आंबट, गोड आणि चटपटीत स्वादांचे अनोखे मिश्रण असलेल्या चाटचे देशभरात कोट्यवधी चाहते आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का की भारतातील कोणत्या शहराला 'चाटची राजधानी' (Chaat Capital of India) म्हटले जाते? ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले उत्तर प्रदेशातील वाराणसी (काशी) हे शहर आपल्या अनोख्या चाट परंपरेसाठी जगभर प्रसिद्ध आहे.