
वाराणसी : जगातील सर्वांत मोठा धर्मोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाकुंभमेळ्याच्या समाप्तीनंतर आता वाराणसी आणि अन्य नजीकची धर्मक्षेत्रे होळीच्या रंगात रंगण्यासाठी सज्ज झाली आहेत. यंदा प्रथमच वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरामध्ये विविध प्रकारचे रंग, अबीर आणि गुलाल यांचा वापर करून रंगपंचमी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मथुरेतील श्री कृष्ण जन्मस्थान मंदिर असलेल्या लड्डू गोपालकडून काशीतील विश्वनाथ मंदिरास विविध रंगांची पेटी ही भेट स्वरूपामध्ये पाठविण्यात आली आहे.