Varanasi Urban Ropeway : वाराणसीत देशातील पहिला नागरी रोपवे अंतिम टप्प्यात; १४८ केबल कार अन् ५० रुपये तिकीट; डिसेंबरमध्ये होणार सुरू

Varanasi Urban Ropeway Project : वाराणसीतील देशातील पहिल्या नागरी रोपवे प्रकल्पाचे ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता असून १४८ केबल कारमधून अवघ्या १५ मिनिटांत प्रवास करता येणार आहे.
Varanasi Urban Ropeway Project

Varanasi Urban Ropeway Project

sakal

Updated on: 

वाराणसी: वाराणसीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेला देशातील पहिला नागरी वाहतूक रोपवे प्रकल्प लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. सुमारे ८०७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे ९६ टक्के काम पूर्ण झाले असून, सध्या अंतिम चाचण्या सुरू आहेत. डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या रोपवेमुळे कैंट रेल्वे स्थानक ते गोदौलिया हा प्रवास अवघ्या १५ ते १६ मिनिटांत करता येणार आहे. सध्या रस्त्याने या अंतरासाठी गर्दीच्या वेळेत ४५ मिनिटांपासून एक तासापर्यंत वेळ लागू शकतो. पूर्ण प्रवासासाठी ५० रुपये तिकीट दर प्रस्तावित करण्यात आला आहे.

Loading content, please wait...