
नवी दिल्लीः राजकीयदृष्ट्या अत्यंत गाजलेला वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प अडचणीमध्ये सापडला आहे. कारण फॉक्सकॉनने वेदांसोबतच्या करारातून माघार घेतली आहे.
१ लाख ५४ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प पुण्याच्या तळेगावमध्ये प्रस्तावित होता. परंतु गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हा प्रकल्प गुजरातला नेण्यात आला होता. वेदांता आणि तैवानची बलाढ्य कंपनी फॉक्सकॉन संयुक्तीकरित्या हा प्रकल्प उभा करणार होते.
परंतु आता फॉक्सकॉनने सदरील करारामधून माघार घेतली आहे. मात्र हा प्रकल्प गुजरातमध्ये पूर्णत्वाला नेण्यासाठी केंद्र सराकर कटिबद्ध असल्याचं दिसून येतंय. ''दोन कंपन्यांमधअये काय झालं त्याच्यात सरकार पडणार नाही, दोन्ही कंपन्यांची भारतामध्ये गुंतवणूक आहे'' असं स्पष्टीकरण केंद्राने दिलंय.
दुसरीकडे वेदांताने हा प्रकल्प गुजरातमध्ये यशस्वी करु, असा विश्वास व्यक्त केल्याची माहिती आहे. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे होणाऱ्या प्रकल्पातून सुमारे १ लाख २० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारा महत्त्वकांक्षी प्रकल्प सुमारे १ लाख ५४ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प पिंपरी चिंचवड जवळच्या तळेगाव येथे होणार होता.
मात्र हा प्रकल्प पद्धतशीरपणे शिंदे-फडणवीस सरकारने गुजरातला जावू दिल्याचा आरोप तेव्हा झाला होता. त्यामुळे पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील लाखो तरुणांच्या तोंडचा घास पळवला गेला. त्याचबरोबर या उद्योगावर अवलंबून असणारे अनेक छोटे-मोठे उद्योग वाहतूक व्यवस्था, अशा प्रचंड लाखो लोकांचे नुकसान झाले. आता हा प्रकल्प गुजरातमध्ये होता की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.