

Yogi Adityanath on History, Sacrifice and Values
Sakal
उत्तर प्रदेश : इतिहास हा त्याग आणि बलिदानाचा असतो, अत्याचाराचा नाही, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी केले. ‘वीर बाल दिवस’ानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी मुघल बादशहा औरंगजेबावर तीव्र टीका केली. औरंगजेब स्वतःला हिंदुस्थानचा बादशहा म्हणवून घेत होता, पण ती त्याची मोठी चूक होती, असे ते म्हणाले. आज देशात त्याचे नाव घेणारे फारसे कोणी उरलेले नाही, तसेच त्याच्या थडग्यालाही कोणी विचारत नाही, असा टोला त्यांनी लगावला. गुरु तेग बहादूर यांना आव्हान देणे ही औरंगजेबाची मोठी घोडचूक ठरली, कारण त्यांच्या तेजासमोर क्रूरता टिकू शकत नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
https://x.com/myogiadityanath/status/2004470761839644765