esakal | पश्चिम बंगालमध्ये मुलीचा सापडला मृतदेह; जमावाचा उद्रेक, वाहनांची जाळपोळ

बोलून बातमी शोधा

Vehicles Set On Fire In Bengal After Alleged Gang-Rape Murder Of Student

पश्चिम बंगालमध्ये एका शाळकरी मुलीचा मृतदेह सापडला असून तिच्यावर बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप करण्यात येत असून याविरोधात संतप्त जमाव रस्त्यावर उतरला आहे. संतप्त जमावाकडून राष्ट्रीय महामार्ग अडवून जोरदार निदर्शन करण्यात आली आहेत.

पश्चिम बंगालमध्ये मुलीचा सापडला मृतदेह; जमावाचा उद्रेक, वाहनांची जाळपोळ
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये एका शाळकरी मुलीचा मृतदेह सापडला असून तिच्यावर बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप करण्यात येत असून याविरोधात संतप्त जमाव रस्त्यावर उतरला आहे. संतप्त जमावाकडून राष्ट्रीय महामार्ग अडवून जोरदार निदर्शन करण्यात आली आहेत.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हत्या करण्यात आलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबाने शोध सुरु केला होता. अखेर एका झाडाखाली तिचा मृतदेह सापडला होता. यानंतर स्थानिकांनी मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

यानंतर, कोलकातापासून ५०० किमी अंतरावर असणाऱ्या ठिकाणी जवळपास दोन तास आंदोलन सुरु होतं. पोलिसांनी आंदोलकांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी जमावाकडून हिंसाचार सुरु झाला. अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दुपारी दोन वाजता सुरु झालेलं हे आंदोलन अनेक तास सुरु होते. आंदोलकांनी यावेळी तीन बसेस आणि पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ केली. जवळपास पाच वाजण्याच्या सुमारास आंदोलक दुसऱ्या ठिकाणी गेले आणि पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केला.  मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर काही वेळातच आंदोलनाला सुरुवात झाली होती. पोलिसांनी सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत.

दरम्यान, पश्चिम बंगाल पोलिसांनी मुलीचा शवविच्छेदन अहवाल ट्विट केला असून विषबाधा झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं आहे. तसंच शरीरावर कोणतीही जखम झाली नसल्याचं सांगत लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा फेटाळला आहे. दरम्यान, प्रकरणावरुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून अद्याप पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.