जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

जेष्ठ मराठी अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे आज पहाटे निधन झाले. आई माझी काळूबाई या मालिकेच्या शूटिंग दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. 

सातारा : मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं आज पहाटे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झालं आहे. 'आई माझी काळूबाई' या मालिकेतील 27 जणांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये आशालता या देखील मुख्य भूमिकेत होत्या. पण, यादरम्यान 27 जणांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाची लागण झाल्यामुळे आशालता यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. सोमवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात होतं. पण त्यांची 4 दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे अति दक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. संजय साठे आणि हृदय विकार तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी दिली. गेले 5 दिवस आणि मृत्यूसमयी प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल या त्यांच्या सोबत होत्या.

अधिक माहितीनुसार, मुंबईतील एक डान्स ग्रुप चित्रीकरणासाठी गेला होता. तेव्हा कोरोनाचा फैलाव झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साताऱ्यातील हिंगणगाव (ता. फलटण) या गावी हे चित्रीकरण सुरू होतं. सुरुवातील इथल्या गावकऱ्यांनी चित्रीकरणासाठी नकार दिला होता. राज्य सरकारने कोरोनामध्ये चित्रीकरणाची परवानगी दिली असली तरी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे सांगितले आहे. शूटिंगदरम्यान तेथील सेट वारंवार सॅनिटाइझर करण्याबरोबर कलाकारांनी मास्क लावणे बंधनकारक आहे.

राज्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काळुबाईच्या नावाने चांगभलं या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल आहेत. कोरोनाच्या काळात शुटींगला परवानगी देण्यात आली असली तरी यादरम्यान नियमांचं पालन देखील महत्वाचं आहे. सेटवर नियमांचं पालन करत काळजी घेतली जात असताना देखील एवढ्या जणांना कोरोनाची बाधा कशी झाली यावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Veteren marathi actress ashalata vabgaonkar passes away due to corona