
नवी दिल्ली : आरोग्याचे कारण देत जगदीप धनकड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने या पदाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तयारी पूर्ण झाल्यानंतर मतदानाच्या तारखा जाहीर केल्या जातील, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनकड यांनी अनपेक्षितपणे पदाचा राजीनामा दिला होता.