Jagdeep Dhankhar Resigns: मोठी बातमी! उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला राजीनामा

Vice President Jagdeep Dhankhar resignation: जाणून घ्या, नेमकं काय कारण सांगितलं आहे.
Jagdeep Dhankhar
Jagdeep Dhankharsakal
Updated on

Vice President Jagdeep Dhankhar's Sudden Resignation: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणामुळ त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रपीत द्रौपदी मुर्मू यांना याबाबत एक पत्र पाठवले आहे. ज्यामध्ये त्यांनी प्रकृती अस्वास्थाचे कारण देत संविधानाच्या कलम ६७(अ) अंतर्गत राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. तसेच, राष्ट्रपतींनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि सौहार्दपूर्ण संबंधांबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.

राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात धनखड यांनी म्हटले आहे की, आरोग्याच्या देखभालीस प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी मी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे. आपल्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मिळालेल्या अमूल्य अनुभवांबद्दल मी मनापासून आभारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकार्य आणि पाठबळ अमूल्य आहे. माझ्या कार्यकाळात मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे.

Jagdeep Dhankhar
Asaduddin Owaisi : मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता झाल्यावर ओवेसींनी केलं मोठं विधान, म्हणाले...

याशिवाय, जगदीप धनखड यांनी असंही लिहिले की, संसदेतील सर्व सन्माननीय सदस्यांकडून मला मिळआलेला स्नेह, विश्वास आणि आदर माझ्या हृदयात आयुष्यभर राहील. या महत्त्वाच्या काळात भारताची आर्थिक प्रगती आणि अभूतपूर्व विकासाचे साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी होणे माझ्यासाठी एक भाग्याची आणि समाधानाची बाब राहिली आहे.

Jagdeep Dhankhar
Workplace Harassment : महिला कर्मचारीने नकार देताच, तिचा युरोपियन बॉस संतापला अन् मग...!

जगदीप धनखड यांनी ६ ऑगस्ट २०२२ रोजी भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. आता त्यांनी पावसाळी अधिवेशन सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय आज(सोमवार) त्यांनी राज्यसभेतील राजकीय पक्षांना तणाव कमी करण्यास आणि सुसंवादी वातावरण निर्माण करण्यास सांगितले. ते म्हणाले की, सतत संघर्षाच्या स्थितीत समृद्ध लोकशाही टिकू शकत नाही.

राज्यसभेच्या बैठकीत ते म्हणाले, "राजकारणाचे सार संवाद आहे, संघर्ष नाही. वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळे मार्ग अवलंबू शकतात, परंतु सर्वांचे ध्येय राष्ट्रीय हित आहे. भारतात कोणीही राष्ट्राच्या हिताला विरोध करत नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com