esakal | उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

vyankayya naidu

 देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी सकाळी व्यंकय्या नायडू यांची कोरोनाच चाचणी घेण्यात आली होती. 

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी सकाळी व्यंकय्या नायडू यांची कोरोनाच चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

याबाबत व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. नायडूंना कोणतीही लक्षणं नाहीत. त्यांची प्रकृती ठीक असून घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. व्यंकय्या नायडू यांच्या पत्नीची टेस्ट घेण्यात आली असून त्याची चाचणी निगेटिव्ह आली. त्यासुद्धा सेल्फ आयसोलेट झाल्या आहेत.