Video: भारतीय लष्कराची खरी ताकद! वय 56, पण 60 सेकंदात तब्बल इतके पुल-अप्स; मेजर जनरलचा फिटनेस पाहून नेटकरी अवाक

Major General Prasanna Joshi video gone viral: . भारतीय लष्कराचे मेजर जनरल प्रसन्ना जोशी यांना सल्युट आणि त्यांच्याबद्दल आदर आहे. ऑक्टोबर २०२२ च्या जर्मन पब्लिकेशनमध्ये म्हणून भारताला सर्वात चांगले लष्कर म्हटलं आहे.
Major General Prasanna Joshi
Major General Prasanna Joshi

नवी दिल्ली- मेजर जनरल प्रसन्ना जोशी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये प्रसन्ना जोशी एक मिनिटामध्ये २५ वेळा पुल-अप्स करताना दिसत आहेत. त्यांच्या हा फिटनेस पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. लोकांच्या मनातील त्यांचा आदर आणखी वाढला आहे. जोशी हे ५६ वर्षांचे आहेत.

सदर व्हिडिओ निवृत्त लेफ्टनंट कर्नल जेएस सोढी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की, 'भारतीय लष्कराचे मेजर जनरल प्रसन्ना जोशी यांना सल्युट आणि त्यांच्याबद्दल आदर आहे. भारतीय लष्कराला उगात सर्वात भारी लष्कर उगाच मनलं जात नाही. ऑक्टोबर २०२२ च्या जर्मन पब्लिकेशनमध्ये म्हणून भारताला सर्वात चांगले लष्कर म्हटलं आहे. मला भारतीय लष्करावर अभिमान आहे. जय हिंद.'

Major General Prasanna Joshi
Viral Video: "चलाओ ना नैनों से बाण रे..."; महिला खासदार असं काय म्हणाली की सभापती लाजले? संसदेतील रंजक दृश्य व्हायरल

व्हिडिओमध्ये मेजर जनरल जोशी हे जीममध्ये दिसत आहेत. लष्कराच्या जवानांसाठीची ही जीम आहे. यात जोशी न थांबता पुल-अप्स करत आहेत. एकजण पुल-अप्स मोजत आहे. जोशी यांचे पुल-अप्स झाल्यानंतर जीममधील सर्वजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. आणि त्यांच्या फिटनेसचे कौतुक करतात.

Major General Prasanna Joshi
IND vs SA Video Viral: भारतीय चाहत्यांचे मोठं मन! अवघ्या 7 धावांनी फायनल हारलेल्या द. आफ्रिकन खेळाडूं 'असं' केलं चीअर

२९ जून रोजी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. याला पसंती मिळत आहे. नेटकरी व्हिडिओ शेअर देखील करत आहेत. यावर नेटकरी देत असलेल्या प्रतिक्रिया वाचण्यासारख्या आहेत. प्रसन्ना जोशी यांच्यासारखे अधिकारी आपल्या लष्करात आहेत याचा अभिमान वाटतो, असं एका नेटकऱ्याने म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com