श्रीराम कॉलेजमध्ये बुरख्यामध्ये विद्यार्थिनींचा रॅम्प वॉक; 'जमीयत-ए-उलेमा'ने दिली वॉर्निंग

Shri Ram College
Shri Ram College
Updated on

नवी दिल्ली- मुझ्झपरपूरच्या श्रीराम कॉलेजमधील फॅशन शोवरुन वाद निर्माण झाला आहे. कॉलेजच्या फॅशन शोमध्ये मुस्लिम मुलींनी बुरख्यामध्ये रॅम्प वॉक केला होता. याप्रकरणी जमीयत-ए-उलेमा संघटना आक्रमक झाली आहे. फॅशन शोमध्ये बुरखा दाखवण्यावर आपत्ती दर्शवली आहे. (video of a fashion show led by Muslim women at a college in Uttar Pradesh has gone viral on social media)

कॉलेजमधील व्हिडिओमध्ये काही विद्यार्थी बुरख्यामध्ये रॅम्प वॉक करताना दिसत आहेत. शोमध्ये सहभागी अलिना नावाच्या मुलीनं म्हटलं की, बुरखा देखील फॅशनेबल असू शकतो हे आम्हाला दाखवायचं होतं. बुरखा केवळ परिधान करण्याची वस्तू नाही हे आम्हाला सांगायचं होतं.

Shri Ram College
Burkha incident in Karnataka:मुस्लिम आहात तर बुरखा घाला, बस ड्रायव्हरनं मुलींना बसमध्ये चढण्यास केला मज्जाव

मुस्लिम महिलांना छोट्या कपड्यांमध्ये फॅशन शोमध्ये सहभागी होण्यास बंदी असते. त्यामुळे मुस्लिम महिलांसाठी काहीतरी वेगळे करण्यासाठी हा कार्यक्रम करण्याचं आम्ही ठरवलं. त्यामुळे विविध डिझाईनमधील बुरखा परिधान करुन फॅशन शो करण्यात आला, असं अलिना म्हणाली.

श्रीराम कॉलेजचे शिक्षण डॉ. मनोज यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. हिजाब किंबा बुरखा मुस्लिम महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरु शकतो. शिवाय जागतिक पातळीवर अशा प्रकारच्या फॅशनला मागणी वाढत आहे. सर्व कष्टाळू विद्यार्थी आहेत. त्यांना हिजाब देखील फॅशनबेल असू शकतो हे दाखवून द्यायचं होतं, असं ते म्हणाले.

Shri Ram College
Crime News : बुरखा घालून मॉलच्या महिला शौचालयात घुसून बनवायचा व्हिडीओ; आयटी इंजिनियर अटकेत

जमीयत ए उलेमाचे जिल्हा प्रमुख मौलाना मुक्रम कास्मी यांनी कॉलेजमधील या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. बुरखा हे फॅशनमध्ये दाखवण्याची वस्तू नाही. एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्याचा हा प्रयत्न आहे. भविष्यात अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com