VIDEO: जावेद हबिबांनी डोक्यावर थुंकून कापले केस; महिला आयोगाची कारवाईची मागणी

VIDEO: जावेद हबिबांनी डोक्यावर थुंकून कापले केस; महिला आयोगाची कारवाईची मागणी

नवी दिल्ली : हेअरस्टायलिस्ट जावेद हबिब (celebrity hairstylist Jawed Habib ) यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्यांच्या या व्हिडीओवरुन त्यांच्यावर बरीच टीका होत आहे. सध्या या व्हिडीओवरुन वादात अडकलेल्या जावेद हबिब यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याचं कारण असं आहे की, राष्ट्रीय महिला आयोगाने (The National Commission for Women) आता या व्हिडीओची दखल घेतली असून त्यासंदर्भात कारवाईची मागणी करणारं पत्र देखील लिहलं आहे.

VIDEO: जावेद हबिबांनी डोक्यावर थुंकून कापले केस; महिला आयोगाची कारवाईची मागणी
सुब्रमण्यम स्वामींची याचिका हायकोर्टाने फेटाळली; भाजपलाच दिलेलं आव्हान

राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी यासंदर्भात उत्तर प्रदेशच्या डीजीपींना पत्र लिहलंय. त्यांनी म्हटलंय की, या व्हिडीओची दखल घेत तातडीने जावेद हबिब यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच केलेल्या कारवाईबाबत महिला आयोगाला पुन्हा कळवण्यात यावं. ही माहिती महिला आयोगाने ट्विट करत दिली आहे.

ज्या वर्कशॉपमध्ये हा प्रकार घडला आहे ते वर्कशॉप उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये घेण्यात आलं होतं. यामध्ये जावेद हबिब एका महिलेचे केस कापताना दिसतात. जावेद हबिब त्या महिलेच्या केसावर थुंकताना दिसून येतात आणि म्हणतात, जर तुमच्याकडे पाणी नसेल तर थुंकी तुमच्या मदतीला येऊ शकते. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

VIDEO: जावेद हबिबांनी डोक्यावर थुंकून कापले केस; महिला आयोगाची कारवाईची मागणी
पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत सिद्धू म्हणाले,तुम्हाला 15 मिनिटे थांबावे लागले तर...

हा अनुभव कथन करणाऱ्या महिलेचा आणखी एक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे. त्या व्हिडिओमध्ये तिने स्वत:ची ओळख करुन दिली आहे. ती ब्युटी पार्लर चालवणारी महिला आहे. तिने म्हटलंय की, "काल मी जावेद हबीब सरांच्या वर्कशॉपमध्ये गेले होते. तिथे त्यांनी मला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलावले आणि त्यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले. ते म्हणाले की, पाणी नसेल तर तुम्ही थुंकू शकता. मला माझे केस कापता आले नाहीत. मी जावेद हबिब यांच्याकडे जाऊन केस कापण्यापेक्षा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एखाद्या बार्बर शॉपमध्ये केस कापेन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com