Video Viral: जेवणाच्या पंगतीत प्लेटवरुन शिक्षक-मुख्याध्यापकाची भांडणं| Video Viral Punjab Teacher principal free lunch fight | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral Punjab Teacher principal free lunch fight

Video Viral: जेवणाच्या पंगतीत प्लेटवरुन शिक्षक-मुख्याध्यापकाची भांडणं

teacher principal free lunch fight video: सोशल मीडियातून कधी काय समोर येईल हे सांगता येत नाही, सध्या पंजाबमधील एका व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. फ्री काही मिळणार असेल तर जगातील कोणत्याही देशातील लोकं वेगळं काही करणार नाहीत जिथं फ्री असं लिहिलं आहे तिथं जातील आणि त्या सेवेचा लाभ घेतील, पंजाबमध्ये एका कार्यक्रमामध्ये असलेलं फ्री जेवण घेताना (Social media) विद्यार्थ्यांनी धिंगाणा घातला. मात्र त्यांच्यापेक्षा जास्त शिक्षक आणि त्या शाळेचे मुख्याध्यापक जास्त चर्चेत आले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसमोरच भांडणं केल्यानं ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या (Viral news) प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. नेमकं असं काय झालं होतं. हे आपण जाणून घेणार आहोत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा पंजाबमधील आहे. एका शाळेमध्ये विद्यार्थ्य़ांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित कार्यक्रमानंतर सर्वांसाठी मोफत जेवणाची सोय करण्यात आली होती. कार्यक्रम संपला आणि भुकेल्या विद्यार्थ्यांनी जेवणाच्या टेबलावर धाव घेतली. त्यावेळी मोठा गोंधळ सुरु होता. त्या विद्यार्थ्यांना जेवायला कसे वाढायचे हा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला होता. पहिल्यांदा आम्हाला जेवायला मिळाले पाहिजे असा विदयार्थ्यांचा रोख होता. दुसरीकडे यासगळ्यात शिक्षकांनी देखील या वादात उडी घेतल्याचे दिसून आले.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेण्यासाठी अडीच हजार शाळांमधील वेगवेगळे प्रतिनिधी एका ठिकाणी गोळा झाले होते. त्यामध्ये लहान मुलांना शिस्तीचे धडे देणारे शिक्षक बेशिस्तपणे वागत असल्याचे त्या घटनेवरुन दिसुन आले आहे. त्याची चर्चा सध्या पंजाबभर असून सोशल मीडियावर देखील त्याची दखल घेण्यात आली आहे. मुलांना शिस्तीत कसं राहावं, कसं बोलावं हे सांगणारे शिक्षक त्या कार्यक्रमामध्ये एकमेकांच्या अंगावर धावून जात असल्याचे दिसून आले आहे. कार्यक्रम झाल्यानंतर त्या शिक्षकांनी प्लेट घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी शिक्षक आणि मुख्याध्यापकामध्ये मारामारी झाल्याचेही दिसून आले.

users comment teacher behavior

users comment teacher behavior

45 सेकंदाच्या त्या क्लिपमध्ये आपल्याला पाहायला मिळते की, प्लेट घेण्यासाठी शिक्षक कशाप्रकारे बेशिस्तपणा करत आहेत...काही शिक्षक त्या व्यक्तीला भैय्या एक कुपन घ्या पण आम्हाला जेवण द्या. असं सांगत आहे. जेव्हा शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची मारामारी सुरु झाली तेव्हा एका शिक्षिकेनं त्यावर कमेंट केली आहे. तिनं बघा आता लहान मुलांसारखे शिक्षक एकमेकांशी भांडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Video Viral Punjab Teacher Principal Free Lunch Fight Together Crowd Shocked

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top